Property dispute between former Shiv Sena minister Vijay Shivtare and his son; Girl's sensational post on Facebook!

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्याच्या पत्रात म्हटले आहे की, राज्य मंत्रिपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम काँग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे.

    पुणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे शिवसेनेतील  राजकीय अस्वस्थता उघड झाली असतानाच शिवसेनेचे पुरंदर तालुक्यातील माजी मंत्री विजय शिवतारे यानी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून गुंजवणी धरणाच्या उद्घाटनावरुन स्थानिक काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

    काँग्रेस आमदाराचे अडथळे

    माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्याच्या पत्रात म्हटले आहे की, राज्य मंत्रिपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम काँग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे.

    अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद

    तोंडल येथे काम सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते, असा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल, अशी मागणीही विजय शिवतारे यांनी पत्रातून केली आहे.