माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या पार्थिवावर चैत्यभुमी येथे अंत्यसंस्कार

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दु:खद असल्याची भावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली असुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. १९८५ पासून २००४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं.मला आठवते मी राज्यात कॅबिनेट मंत्री असताना ते राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जेष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईतील अनेक महत्वाचे प्रकल्प राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सर्वांना सोबत घेऊन जातानाच धारावी पुनर्विकास प्रकल्प व्हावा अशी त्यांची आग्रही मागणी होती ते सातत्याने त्यासाठी प्रयत्न देखील करत होते. 

    मुंबई : माजी खासदार व माजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे करोना मुळे दु:खद निधन झाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. चैत्यभुमी, दादर येथे दुपारी करण्यात आले. त्यांच्या निधना बद्दल अनेक मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे.

    काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दु:खद असल्याची भावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली असुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. १९८५ पासून २००४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं.मला आठवते मी राज्यात कॅबिनेट मंत्री असताना ते राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जेष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईतील अनेक महत्वाचे प्रकल्प राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सर्वांना सोबत घेऊन जातानाच धारावी पुनर्विकास प्रकल्प व्हावा अशी त्यांची आग्रही मागणी होती ते सातत्याने त्यासाठी प्रयत्न देखील करत होते.

    एकनाथ गायकवाड  मूळचे सातारा  जिल्ह्याचे होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईत आले. धारावी सारख्या भागात त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. आमदार, खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती.  वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी  लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. अशा शब्दांत सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड  यांना श्रद्धांजली वाहिली.

    आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले आहे. एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना जयदीप कवाडे म्हणाले की, आयुष्यभर त्यांनी आंबेडकरी चळवळीचा  सर्वसमावेशक विचार तेवत ठेवला. राजकारणात अनेक चढ-उतार सोसले. पण कधीही आपल्या तत्वांचा त्याग केला नाही. आपली साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे व कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व आमच्या भगिनी प्रा. वर्षाताई गायकवाड तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अश्या शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.