madan sharma met rajypal

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे इतर माजी निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांसह राज्यापालांच्या भेटीला गेले होते. राज्यपालांची भेट घेवून मदन शर्मा यांनी आपले दुःख मांडले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणी नंतर मदन शर्मा यांच्या मुलीने देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी केली होती.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शिवसैनिकांनी (Shivsena) माजी नौदल अधिकाऱ्याला (Former Naval Office) घरात घुसून मारहाण केली. या घटनेचा भाजपा तसेच नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. माजी नौदल अधिकाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली होती. ७ ते ८ शिवसैनिकांनी हा हल्ला केला होता. याप्रकरणी मदन शर्मा ( Madan Sharma) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor) यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे. मदन शर्मांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असेही म्हटले होते.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे इतर माजी निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांसह राज्यापालांच्या भेटीला गेले होते. राज्यपालांची भेट घेवून मदन शर्मा यांनी आपले दुःख मांडले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणी नंतर मदन शर्मा यांच्या मुलीने देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी केली होती. दरम्यान मदन शर्मा म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी.

माराहणीनंतर दिलेल्या मुलाखतीत मदन शर्मा यांनी आपली व्यथा मांडली होती. ते म्हणाले मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दुःखद आहे. असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर राजीनामा द्या असे सांगितले. तसेच ही जबाबदारी कोणाला द्यायची हे लोकांना ठरवू द्या. असे शर्मा म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली दखल, ठाकरे सरकारला इशारा

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीची दखल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली आहे. तसेच ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही. अशा शब्दांत ठाकरे सरकारला ठणकावले आहे. तसेच राजनाथ सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधला आहे. आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूर केली आहे. माजी सैनिकांवरील हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दात ठाकरे सरकारला संरक्षणमंत्र्यांनी सुनावले आहे.