माजी नौदल अधिकारी मदन शर्मा घेणार राज्यपालांची भेट

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे इतर माजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. मदन शर्मा यांनी मारहाणीनंतर ठाकरे सरकरा हे गुंडाराज करत असल्याचे म्हटले आहे. मारहाण करणाऱ्या ६ जाणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून त्यांना अटकही झाली होती.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल हस्यात्मक व्यंगचित्र शेअर केल्यामुळे माजी नौदल अधिकारी (Former Naval Officer) यांना शिवसैनिकांनी जबर मारहाण केली होती. यामुळे भाजपाने शिवसनेला चांगलेच धारेवर धरले होते. मदन शर्मा (Madan Sharma) यांना त्यांच्या घरात घुसुन ७ ते ८ शिवसैनिकांनी मारहाण केली होती. मदन शर्मा आज दुपारी १२ वाजता राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे इतर माजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. मदन शर्मा यांनी मारहाणीनंतर ठाकरे सरकरा हे गुंडाराज करत असल्याचे म्हटले आहे. मारहाण करणाऱ्या ६ जाणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून त्यांना अटकही झाली होती. परंतु सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे. त्यामुळे मारहाण करणारे आता मोकाट फिरत आहेत. असे मदन शर्मा यांनी म्हटले होते.