माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग रशियात पळून गेले; केंद्राची परवानगी कशी मिळाली? राज्य सरकारकडून शोध सुरू

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर सिंग यांच्या विरोधातही वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने त्यांची देखील राज्य पोलीस विभागाकडून चौकशी केली जात आहे. तसेच एंटालिया प्रकरणी देखील सिंग यांना एन आय ए कडून चौकशीचे समन्स बजावण्यात आल्यानंतर सिंग रशीयाला पळून गेल्याची माहिती उघड झाली आहे(Parambir Singh absconds to Russia). या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच माध्यमांना याबाबत माहिती दिली.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर सिंग यांच्या विरोधातही वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने त्यांची देखील राज्य पोलीस विभागाकडून चौकशी केली जात आहे. तसेच एंटालिया प्रकरणी देखील सिंग यांना एन आय ए कडून चौकशीचे समन्स बजावण्यात आल्यानंतर सिंग रशीयाला पळून गेल्याची माहिती उघड झाली आहे(Parambir Singh absconds to Russia). या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच माध्यमांना याबाबत माहिती दिली.

    रशियाला पळून गेल्याची माहिती आहे, मात्र केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय ते जावू शकत नाहीत. याबाबत त्यांना परवानगी देण्यात आली की ते विना परवानगी फरार झाले आहेत?

    तसेच परवानगी दिली असल्यास कुणी आणि कश्याप्रकारे परवानगी दिली याचा तपास राज्यांच्या गृहविभागाकडून सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही सिंग यांचा शोध घेत आहोत अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.