माजी रणजीपटू वासू परांजपे यांचे निधन

खेळाडूंच्या गुणवत्ता उत्तम हेरणारा अवलिया प्रशिक्षक म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एकदा वासू सरांनी १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची मुश्ताक अली यांच्याशी ओळख करून देताना ते म्हणाले होते की,  हा सुनील गावसकरानंतर देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे.

    क्रिकेटचे द्रोणाचार्य अशी ओळख असलेले भारतीय क्रिकेट संघाचे नावाजलेले प्रशिक्षक वासू परांजपे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. बॉट्समन असो की बॉलर वासू सर प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करायचे व त्यानुसारच त्याला प्रशिक्षण द्यायचे. त्यांच्या या सवइमुळे क्रिकेट विश्तात त्यांची द्रोणाचार्य अशी ओळख होती. बडोदा आणि मुंबईसाठी त्यांनी २९ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.

    क्रिकेटमधे निवृत्ती जाहिर केल्यानंतर परांजपे प्रशिक्षणाकडे वळले. खेळाडूंच्या गुणवत्ता उत्तम हेरणारा अवलिया प्रशिक्षक म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एकदा वासू सरांनी १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची मुश्ताक अली यांच्याशी ओळख करून देताना ते म्हणाले होते की,  हा सुनील गावसकरानंतर देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे.

    सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, राहुल द्रविड, संदीप पाटील, अनिल कुंबळे, युवराज सिंग, रमेश पवार यासोबतच श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, रोशन महानामा यांना वासू परांजपे यांनी प्रशिक्षण दिलं आहे. गावसकरांना ‘सनी’ हे टोपणनाव देखील वासू सरांनीच दिलं.

    अशा या अवलीयाचा आज मृत्यू झाला. त्यांना नवराष्ट्रकडून भावपुर्ण श्रध्दांजली.