Former Shiv Sena MLA Trupti Sawant defeating Narayan Rane in BJP; Entered in the presence of Devendra Fadnavis

तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव २०१५ मध्ये केला होता. त्या नंतर २०१९ मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यानी बंडखोरी केली होती. त्यात कॉंग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचा फायदा झाला आणि ते विजयी झाले. त्या नंतर त्यानी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    मुंबई : शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री ‘ निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व  या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले आहे.

    तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव २०१५ मध्ये केला होता. त्या नंतर २०१९ मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यानी बंडखोरी केली होती. त्यात कॉंग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचा फायदा झाला आणि ते विजयी झाले. त्या नंतर त्यानी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    कै. बाळा सावंतांच्या निष्ठावंत शिवसैनिकांवर झालेला अन्यायामुळे बंडखोरी केली होती. त्या मतांच्या विश्वासामुळेच मी भाजप प्रवेश केलाय, अशी भूमिका तृप्ती सावंत यांनी मांडली.