Former Shiv Sena MLA Trupti Sawant defeating Narayan Rane in BJP; Entered in the presence of Devendra Fadnavis

“तृप्ती सावंत यांनी भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षाचा आधार घेतला. त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला आहे” महाडेश्वरांना शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिल्यानेच तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर सावंतांची पक्षातून हकालपट्टी झाली, मात्र बंडखोरीचा फटका बसल्याने सावंतांसह महाडेश्वरही पराभूत झाले होते.

    मुंबई : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये शिवसेनेच्या बंडखोर माजी आमदार तृप्ती सावंत यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या विरोधात निवडणूक हारलेल्या माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांच्यावर टिका केली आहे.

    “तृप्ती सावंत यांनी भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षाचा आधार घेतला. त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला आहे” महाडेश्वरांना शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिल्यानेच तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर सावंतांची पक्षातून हकालपट्टी झाली, मात्र बंडखोरीचा फटका बसल्याने सावंतांसह महाडेश्वरही पराभूत झाले होते.

    “बाळा सावंत हे निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेने अनेक संधी दिल्या आहेत. त्यांना नगरसेवक, आमदार केले. कोणताही अन्याय केला नाही. तृप्ती सावंत कार्यरत नसताना त्यांना आमदारकी दिली.  त्यामुळेच नारायण राणे यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराला शिवसैनिकांच्या ताकदीमुळे पराभूत करण्यात यश मिळाले होते” असे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर
    बंडखोरी केल्यामुळे हकालपट्टी म्हणाले.

    महाडेश्वर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘तृप्ती सावंत यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. शिवसेनेने त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय केलेला नाही. पण त्यांनी आता भाजपसारख्या बेगडी हिंदुत्ववादी पक्षाचा आधार घेतलाय. त्यांनी त्या पद्धतीने शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला आहे. त्यांच्या जाण्याने कोणत्याही पक्षावर, मतदारसंघातही परिणाम होणार नाही” असा दावा महाडेश्वरांनी केला.