शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले (Former Shiv Sena MP Mohan Rawale) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ७२ वर्षांचे होते. मुंबईतील परळ-लालबाग ( Paral-Lalbaug) भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांचे रावले हे निकटवर्तीय समजले जात.

मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार आणि परळ ब्रँड अशी ओळख असलेले मोहन रावले (Former Shiv Sena MP Mohan Rawale) यांचे गोव्यात (Goa) निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (South-Central Mumbai Lok Sabha constituency) ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील परळ-लालबाग ( Paral-Lalbaug) भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray)  यांचे रावले हे निकटवर्तीय समजले जात.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मोहन रावले गेले, असे सांगत कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले नेते असे वर्णन करत संजय राऊत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मोहन रावले यांची ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच ओळख होती. मोहन रावले पाच वेळा खासदार झाले, मात्र अखेरपर्यंत ते सगळ्यांसाठी मोहनच राहिले अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मोहन रावले यांनी सन १९७९-८४ या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळले होते. पुढे १९९१ पासून ते २००९ पर्यंत सलग पाच वेळा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. अत्यंत साधी राहणी आणि सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क दांडगा होता.