माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडणार? नेत्यांमध्ये नाराजी कायम

उत्तरप्रदेश काँग्रेसमधील मोठे प्रस्थ आणि ब्राह्मण नेते व माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपाचे सदस्यत्व मिळविल्यानंतर आता उर्वरित नाराज नेतेही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता पुढचा क्रमांक महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचा असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. तथापरि देवरा यांनी एक ट्वीट करून पक्षाला यावर चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

    मुंबई : उत्तरप्रदेश काँग्रेसमधील मोठे प्रस्थ आणि ब्राह्मण नेते व माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपाचे सदस्यत्व मिळविल्यानंतर आता उर्वरित नाराज नेतेही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता पुढचा क्रमांक महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचा असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. तथापरि देवरा यांनी एक ट्वीट करून पक्षाला यावर चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

    पक्षाला पुन्हा एकदा मजबूत करण्याची गरज आहे. पक्षातच असे काही नेते आहेत ज्यांनी संधी दिल्यास निकाल परिणामकारक मिळू शकतात. माझे अनेक मित्र आणि सहकाऱ्यांना संधी मिळाली असती तर त्यांनी साथ सोडली नसती असे मिलिंद देवरा म्हणाले.

    सूत्रांन दिलेल्या माहितीनुसार देवरा बऱ्याच काळापासून पक्षावर नाराज आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. त्यामउळेच तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देवरा यांना ते निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांना राज्यसभेत पाठविणार असल्याचे आश्वासन दिले होते. तथापि हे आश्वासन कधीच पूर्ण करण्यात आले नाही. वेळोवेळी देवरा पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची अफवा उडत राहिली आहे. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने जर वेळीच पावले उचलली नाही तर अनेक युवा नेते पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे.

    हे सुद्धा वाचा