मनसुखच्या हत्येसाठी  पैसा पुरवणारा सापडला? प्रदीप शर्माच्या जवळच्या व्यक्तीनेच केली मदत

मनसुख हिरेन खून प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील एका मोठ्या व्यापाराचा जबाब नोंदविला आहे. हा व्यापारी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माचा नीकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात या व्यापाऱ्यास एनआयए साक्षीदार बनविणार असल्याचे समजते.

    मुंबई : मनसुख हिरेन खून प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील एका मोठ्या व्यापाराचा जबाब नोंदविला आहे. हा व्यापारी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माचा नीकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात या व्यापाऱ्यास एनआयए साक्षीदार बनविणार असल्याचे समजते.

    हिरेनच्या हत्येनंतर आरोपी संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोठीकुरी आणि मनीष सोनी नेपाळला गेले होते. या चारही जणांना नेपाळला पाठविण्याचा खर्च याच व्यापाऱ्याने केला होता, अशी माहिती एनआयएच्या सूत्राने दिली.

    दरम्यान, शर्माच्या सांगण्यावरून चारही आरोपींचा नेपाळला जाण्यासाठी खर्च केला परंतु या चारही जणांनी गुन्हा केला असल्याची माहिती नव्हते, असे या व्यापाऱ्याने जबाबात म्हटले आहे.