Four lakh assistance to the family of a woman who died after falling from a tree; Minister Aditya Thackeray called on him

तौक्ते चक्रीवादळाने वरळी येथे झाड पडून मृत्यू झालेल्या संगीता खरात या महिलेच्या कुटूंबियाला राज्य सरकारने चार लाखाची आर्थिक मदत करण्यात आली, आज पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन चार लाख रुपयाची मदत सुपूर्द केली.

    मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने वरळी येथे झाड पडून मृत्यू झालेल्या संगीता खरात या महिलेच्या कुटूंबियाला राज्य सरकारने चार लाखाची आर्थिक मदत करण्यात आली, आज पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन चार लाख रुपयाची मदत सुपूर्द केली.

    तौक्ते चक्री वादळा दरम्यान ११४ किलोमीटर वा-याता वेग होता. या चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबईतील २२०० हुन अधिक झाडे आणि फांद्या पडल्या. यावेळी वरळी येथे अंगावर झाड पडून संगीता खरात या महिलेचा मृत्यू झाला.

    संगीता खरात या धुणीभांडी करून आपले घर चालवत होत्या. कुटुंबाला त्यांचा आधार होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. या महिलेच्या कुटुंबाला राज्य सरकारने ४ लाख रुपयाची मदत जाहिर केली होती. सोमवारी पर्यावरण मंत्री व या विभागाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्य सरकारची चार लाख रुपयाची मदत खरात कुटुंबीयांना दिली.