कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणार चौथा सेरो सर्व्हे; सर्वेक्षणात सहा वॉर्ड्सचा समावेश

झोपडपट्टी, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागातील किती नागरिकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाल्या हे समजण्यासाठी सेरो सर्वेक्षण केले जाते आहे. पालिका आणी काही संस्थांनी आतापर्यंत तीन सेरो सर्वेक्षण करून त्यांचे अहवाल सादर केले आहेत. आता चौथा सेरो सर्व्हे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सहा वॉर्डमध्ये हा सर्व्हे केला जाणार आहे. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्व्हे करण्यात येणार आहे.

    मुंबई : झोपडपट्टी, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागातील किती नागरिकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाल्या हे समजण्यासाठी सेरो सर्वेक्षण केले जाते आहे. पालिका आणी काही संस्थांनी आतापर्यंत तीन सेरो सर्वेक्षण करून त्यांचे अहवाल सादर केले आहेत. आता चौथा सेरो सर्व्हे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सहा वॉर्डमध्ये हा सर्व्हे केला जाणार आहे. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्व्हे करण्यात येणार आहे.

    झोपडपट्टी भागात आधी केलेल्या सेरो सर्व्हेमध्ये ७० टक्के अँटीबॉडिजचे प्रमाण होते. त्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या सिरो सर्वेमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४५ आणि ४१ झाले. मात्र त्या सेरो सर्व्हेच्या अहवालाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चौथा सेरो सर्व्हे केला जाणार आहे. हा सर्व्हे दोन झोपडपट्ट्या, दोन मध्यमवर्गीय वस्त्या आणि दोन उच्चभ्रू वॉर्ड्समध्ये सर्वे पालिकेकडून करण्यात येणार आहे. या सर्वेमध्ये ठराविक वस्त्यांमधील काही नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्वे केला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

    या सेरो सर्वेत किती लोकांचे नमुने घ्यायचे हे वैद्यकीय टीम ठरवणार आहे. येत्या १५ दिवसांत या सर्व्हेला सुरुवात करण्याचे ठरले असून जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सर्वेचा अहवाल प्रसिध्द करण्याचा प्रयत्न राहणार आहे.