नागरिकांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त करताना म्हटले आहे की, मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

  मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भाजपने केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी  व्टिट करत सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

  जनतेचा आवाज दाबता येत नसतो

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त करताना म्हटले आहे की, मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

  या विरोधात उठणारा आवाज दाबण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो! डांबरीकरणानंतर केवळ १२ तासांत पुन्हा खड्डे पडले तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे’.

  जनता निवडणुकीत धडा शिकवेल

  त्यांनी म्हटले आहे की, दोन्हीही महानगरपालिका प्रशासनाकडून अनेकदा झालेल्या अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना हा कर्तव्य चोख बजावत असल्याचा आव आणून आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार झाला आहे. मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल.