Six additional festival trains between Pune and Barauni! Superfast Express will make the journey much faster

दरवर्षी गणेशचतुर्थीसाठी आम्ही मुबंईवरुन बसेस सोडतो. पण यावर्षी सन्मानीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार मानण्यासाठी राणे साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान देऊन, मोदी साहेबांनी कोकणाला आशीर्वाद दिला म्हणून, या वर्षी ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन आम्ही गणेश चतुर्थीसाठी सोडणार आहोत.

    मुंबई : दरवर्षी गणेशचतुर्थीसाठी आम्ही मुबंईवरुन बसेस सोडतो. पण यावर्षी सन्मानीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार मानण्यासाठी राणे साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान देऊन, मोदी साहेबांनी कोकणाला आशीर्वाद दिला म्हणून, या वर्षी ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन आम्ही गणेश चतुर्थीसाठी सोडणार आहोत.

    जवळपास अठराशे नागरिक या ट्रेनमधून जावू शकतात. दादरवरून कणकवली, वैभववाडी, आणि सावंतवाडीला ही रेल्वे जाणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 8 नंबरवरुन ही रेल्वे सुटणार आहे.

    हा प्रवास विनामूल्य असणार आहे. या प्रवासादरम्यान आम्ही आपल्याला एक वेळ जेवण सुद्धा देणार आहोत. तरी जास्तीत जास्त लोकांनी यांचा फायदा घ्यावा असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.