Freshwater springs found in Dadar's Shivaji Park grounds; Water started flowing at the bottom of five wells

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गोड्या पाण्याचे पाच स्त्रोत सापडले आहेत. समुद्रालगत असलेल्या मैदानात गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे शिवाजी पार्क नुतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नुतनीकरणाच्या कामासाठी ३५ विहिरी खोदण्यात आल्या होत्या. त्यात पाच विहिरींमध्ये गोडे पाणी लागले आहे.

    मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गोड्या पाण्याचे पाच स्त्रोत सापडले आहेत. समुद्रालगत असलेल्या मैदानात गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे शिवाजी पार्क नुतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नुतनीकरणाच्या कामासाठी ३५ विहिरी खोदण्यात आल्या होत्या. त्यात पाच विहिरींमध्ये गोडे पाणी लागले आहे.

    भूगर्भशास्त्रज्ञांनी या गोड्या पाण्याच्या विहिरींचा शोध लावला आहे. दादर- शिवाजी पार्क भागात समुद्र अवघ्या काही अंतरावर असला तरीही या भागात अनेक जुन्या विहीरी होत्या. कालांतराने त्या बुजवण्यात आल्या. महिमपासून- वरळीपर्यंत आणि समुद्रापासून सावरकर मार्गापर्यंत वालुकामय भाग आहे. त्यामुळे इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, अशी माहिती भूगर्भशास्त्र्यांनी दिली आहे. तसेच, वालुकामय भाग असल्याने येथे विहीरी लागणार याची खात्री होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

    शिवाजी पार्क मैदानाच्या नुतनीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी प्लॅटिनम रॉडच्या सहाय्याने या गोड्या पाण्याच्या विहिरींचा शोध लावला आहे. तसेच, आजच्या घडीला प्रत्येक विहिरीत १. ५० लाख लिटर पाणी आहे. व शिवाजी पार्क परिसराची पाण्याची गरज ३ लाख आहे. त्यामुळे दिवसाआड या पाण्याचा वापर केला तर या विहिरीतील पाण्याची पातळी खाली जाणार नाही, असे भूगर्भशास्त्रज्ञ यांनी म्हटले आहे.