Murder

पीडितेचं वय २९ वर्ष आहे. ती मुंबईतील वसई एव्हरशाईन या ठिकाणी राहते. परंतु आरोपी तरूण हा तरूणीचा जवळचा मित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात मैत्रिचे संबंध होते. पण काही कारणास्तव दोघांच्या मैत्रित फूट पडली. यामुळे तरूणीने आरोपी तरूणाशी असलेले मैत्रीचे संबंध तोडले. याच गोष्टीचा त्रागा करत आरोपी तरूणाने तरूणी व तिच्या आईवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मुंबई: मैत्री तोडल्यामुळे मित्रानेच आपल्या मैत्रिणीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या वसई परिसरात घडली आहे. तरूणाने मैत्रिणीसह तिच्या आईवर देखील धारदार चाकून हल्ला केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची चौकशी केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचं वय २९ वर्ष आहे. ती मुंबईतील वसई एव्हरशाईन या ठिकाणी राहते. परंतु आरोपी तरूण हा तरूणीचा जवळचा मित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात मैत्रिचे संबंध होते. पण काही कारणास्तव दोघांच्या मैत्रित फूट पडली. यामुळे तरूणीने आरोपी तरूणाशी असलेले मैत्रीचे संबंध तोडले. याच गोष्टीचा त्रागा करत आरोपी तरूणाने तरूणी व तिच्या आईवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

    आरोपीने विष प्राशन करून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न

    या घटनेनंतर सदर आरोपीने विष प्राशन करून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. परंतु आरोपीने अशा प्रकारचं भयानक कृत्य करण्यामागे काय कारण आहे. त्यांच्याच मैत्रीचेचं संबंध होते का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.