भाजपप्रणित राज्यातच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा : अनंत गाडगीळ

उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामूदायिकरित्या शेकडो प्रेतांना अग्नि दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य सोशल मीडियावर वायरल झाली. उत्तर प्रदेश हे आता “नाथांचे नसून अनाथांचे राज्य” बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी उपरोधिकपणे म्हंटले आहे. गोव्यामधे ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.

    मुंबई : २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल ना केवळ खुद्द स्थानिक प्रसार माध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले, पण सन्मा. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोलही सुनावले. यामुळे, गुजरातचे “अकार्यक्षम मॉडेल”च आता देशापुढे उघड़ झाले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

    उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामूदायिकरित्या शेकडो प्रेतांना अग्नि दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य सोशल मीडियावर वायरल झाली. उत्तर प्रदेश हे आता “नाथांचे नसून अनाथांचे राज्य” बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी उपरोधिकपणे म्हंटले आहे. गोव्यामधे ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.

    “मुख्यमंत्र्यांवर राणेंची (विश्वजीत) आगपाखड़” हे महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यात भाजपमधील दररोजचे चित्र आहे असा टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बेंगलुरु शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या “कोरोना-मृतांसाठी राखीव” ठेवाव्या लागल्या आहेत.

    सारांश, गेल्या महिन्याभरातील वरील राज्यांअंतर्गत परिस्थितीच्या सर्वेक्षणानंतर भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच “मोदी मॉडेलचा फज्जा” उडाला असल्याची टीका गाडगीळ यांनी केली आहे.