संकटाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचा दिलासा, सलग १२ दिवस नो महागाई

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग बाराव्या दिवशी स्थिर आहेत. क्रूड ऑईलच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार न झाल्याचा परिणाम देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होत असून त्यामुळे सलग १२ दिवस इंधनाच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

    गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट देशावर असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी मात्र वाहनधारकांना एक प्रकारे दिलासाच दिल्याचं चित्र आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणाऱ्या दरवाढीला गेल्या काही दिवसांपासून लगाम लागला असून दर बाराव्या दिवशीही स्थिर आहेत.

    देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग बाराव्या दिवशी स्थिर आहेत. क्रूड ऑईलच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार न झाल्याचा परिणाम देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होत असून त्यामुळे सलग १२ दिवस इंधनाच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

    मुंबईत पेट्रोलचा दर ९६ रुपये ८३ पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर ८७ रुपये ८१ पैसे प्रतिलिटर एवढा आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर ९० रुपये ४० पैसे आणि डिझेलचा दर ८० रुपये ७३ पैसे इतका आहे. १५ एप्रिल रोजी पेट्रोलचे दर १४ पैशांनी तर डिझेलचे दर १६ पैशांनी कमी झाले होते. त्यानंतर या दरात बदल झालेले नाहीत.

    लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलची मागणी घटत चालल्याची परिस्थिती आहे. मागणी कमी झाल्याचा परिणामही इंधनाच्या दरावर दिसत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनजन्य परिस्थिती असल्यामुळे क्रूड ऑईलची मागणी घटलीय. त्याचा परिणामही इंधनाच्या दरावर होत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळातही कच्च्या तेलाची मागणी घटल्याचा परिणाम इंधनाच्या दरावर झाला होता. यंदा पुन्हा एकदा तसंच चित्र निर्माण होतं की काय,अशी परिस्थिती दिसू लागली आहे.