फरार साहिल शाहचा अटकपूर्व अर्ज फेटाळला; सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा साहिलवर आरोप

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह त्याच्या साथीदारांना ड्रग्स पुरवल्याचा आरोपामुळे केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथका (एनसीबी)च्या रडावर असलेला आणि सध्या फरार असलेल्या साहिल शहा याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

    मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह त्याच्या साथीदारांना ड्रग्स पुरवल्याचा आरोपामुळे केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथका (एनसीबी)च्या रडावर असलेला आणि सध्या फरार असलेल्या साहिल शहा याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

    सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे रॅकेटसमोर आल्यानंतर एनसीबी साहिल शहाच्या मागावर आहे. साहिल हा पूर्वी सुशांत राहत असलेल्या वांद्रे येथील सोसायटीतच राहत होता. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने केलेल्या तपासात सुशांतला ड्रग्स दिल जात असल्याचे उघड झाले होते.

    या प्रकरणात एनसीबीने एकापाठोपाठ एक अनेक आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्सही जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने साहिलविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र एनसीबीची कारवाई टाळण्यासाठी साहिल सध्या फरार आहे. दरम्यान सहिलकडून याआधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनसीबी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानिर्णयाला आव्हान देत साहिलने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.