…अन् पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीकरीता बुधवारी दुपारी मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

    सिडको (वा.) : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीकरीता बुधवारी दुपारी मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

    घोडके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबतच्या अधिसूचनेवर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असली तरी ओबीसी समाजास तातडीने न्याय मिळण्याची शक्यता धूसर असल्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी मी मंत्रालयासमोर आत्मदहन करीत आहे.

    माझ्या या कृतीनंतर तरी राज्यकर्ते आणि संबंधित इतर सर्व यंत्रणांना कदाचित जाग येईल आणि ओबीसी समाजाचे कल्याण होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आम्ही वेळाेवेळी निदर्शने केली, रास्ता रोको केले परंतु अपेक्षाभंगच झाल्याने ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी टोकाचे पाऊल म्हणून मंत्रालयासमोर आत्मदहन करीत आहे.