मॅट्रिमोनिअल साईटवरुन ओळख करून मुलींची फसवणूक करणारा भामटा गजाआड; फसवणुकीसाठी करायचा वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर

आरोपी महेश प्रत्येक मुलीला फसवताना स्वतंत्र सिमकार्डचा वापर करायचा. २९ जानेवारीला पुण्यातून एका तरुणीने त्याच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल केला . त्यांनतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यात सुरवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उच्चशिक्षित असून त्याने हॅकर म्हणून काम केले आहे.

    नवी मुंबई:‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मॅट्रिमोनिअल साईटवरुन बनावट प्रोफाईल तयार करून विवाह इच्छुक तरुणी फसवणूक करणाऱ्याला भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महेश गुप्ता उर्फ करण ( ३२) या नावे आरोपीने मॅट्रिमोनिअल साईटवर लग्नाचे खाते रजिस्टर केले होते. यामध्ये आपण उदयोजक असल्याची बतावणी केल्याने तरुणींनी त्याच्या रिक्वेस्टला प्रतिसाद दिला होता.
    मुलींच्यासोबत ओळख झाल्यानंतर आरोपी त्यांना भेटायला महागड्या हॉटेलमध्ये , पबमध्ये बोलवायचा. त्यानंतर हॉटेलचे पबचे बिल मुलींनाच भरायला लावायचा. एवढंच नव्हे तर मुलींसोबत जवळीक साधत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचाही प्रयत्नही ही आरोपीने अनेकदा केला आहे.

    आरोपी महेश प्रत्येक मुलीला फसवताना स्वतंत्र सिमकार्डचा वापर करायचा. २९ जानेवारीला पुण्यातून एका तरुणीने त्याच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल केला . त्यांनतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यात सुरवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उच्चशिक्षित असून त्याने हॅकर म्हणून काम केले आहे. त्याने एमई पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पोलिसांनी आरोपीला बेलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरु आहे.