मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे थाटात आगमन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

मुंबई : राज्यात आज गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज गणरायाचे शांततेत आगमन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंबसह गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा केली आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे तसेच सार्वजनिक गणपती मंडळाना आरोग्योत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.