mumbai ganeshotsav

कोरोनाच्या(Corona) संकटातही मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात मुंबईत(Mumbai) घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे आज मोठ्या भक्तिभावाने विधिवत विसर्जन(Immersion Of Ganesh Idol) झाले.

  मुंबई: कोरोनाच्या(Corona) संकटातही मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात मुंबईत(Mumbai) घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे आज मोठ्या भक्तिभावाने विधिवत विसर्जन(Immersion Of Ganesh Idol) झाले. आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर या आणि कोरोनाचे संकट दूर करा, या अशी आर्त साद घालत भावपूर्ण निरोप दिला.

  मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक टाळा आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत ५४६ घरगुती मूर्तींचे आणि सार्वजनिक ५ मूर्तींचे तर कृत्रिम तलावांमध्ये २ सार्वजनिक मूर्ती मिळून ३०८ मूर्तींचे विसर्जन झाले.

  गेल्या शुक्रवारी घरोघरी गणपती मंगलमूर्ती विराजमान झाल्या होत्या. सुमारे सव्वा लाख घरगुती मूर्तींची तर १० हजाराहून अधिक सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. दिवसभर गणरायाची भक्ती भावाने पूजा, आरती करीत लहान थोरांनी आपल्या आरोग्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्याकरता पालिकेने तयारी केलीच आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाचे सावट असल्याने भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप घ्यावा, असे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.

  मुंबई महानगरपालिकेने ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि १७३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे. विसर्जन शांततेत सुरू आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मुंबई महानगरपालिका, बेस्ट, विविध गणेशोत्सव मंडळे, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अधानी एनर्जी, एमएमआरडीए आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध विभाग यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, होमगार्ड यांना तैनात केले आहे. मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची या उत्सवावर नजर आहे.

  नियम धाब्यावर
  मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनीच मूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जन स्थळी जावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त हर्षद काळे यांनी केले आहे. हा नियम उत्सव काळासाठी बंधनकारक असेल.मात्र आजच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन करताना विसर्जन स्थळांच्या ठिकाणी याचे पालन होत नसल्याचे दिसून आले.