chota rajan

2013 साली अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात छोटा राजनला ही दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला ही शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनसह इतर आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवले. सोबतच छोटा राजनला पाच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

    मुंबई : 2013 साली अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात छोटा राजनला ही दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला ही शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनसह इतर आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवले. सोबतच छोटा राजनला पाच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

    २०१३ मध्ये २८ ऑगस्ट रोजी व्यावसायिक अजय गोसालिया यांच्यावर मालाडमधील इनफिनीटी मॉलबाहेर तिघा अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात गोसालिया आश्चर्यकारक पध्दतीने बचावले. त्यांच्या डागण्यात आलेली गोळी त्यांच्या गळ्यातील मोठ्या पेडंटमध्ये अडकली. यामध्ये गोसालिया गंभीर जखमी झाले होते. त्याबाबत फौजदारी गुन्हा बांगर नगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.

    सीबीआयने भादंवि आणि मोक्कानुसार हत्येचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, हत्यारे बाळगणे इ. कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पुढे राजनच्या सांगण्यावरून सतीश कालिया, प्रकाश निकम यांनी हा हल्ला केला, असा आरोप केला होता. तिघेही यामध्ये फरार आरोपी होते. तर पत्रकार जे डे हत्या खटल्यात निकम आणि कालिया अटकेत होते.

    राजनला बालीहून भारतात आणण्यात आल्यावर गोसालिया हल्ला प्रकरणात अटक करण्यात आले. पोलिसांनी आठजणांविरोधात आरोप पत्र दाखल केले होते. सदर याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली तेव्हा, न्यायालयाने सर्व आरोपींना सक्तमजुरीची सजा सुनावली. तसेच राजनला पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला.