मिठी नदीवर तरंगणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लागणार, सुसज्ज कचरा संकलन यंत्र कार्यरत

हुतामाकीच्या सहकार्याने एक नमुना कचरा संकलक बनवण्यात आले आणि त्याची फिनलँडमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ते मुंबईत आणले जाऊन त्याची एक सलग बांधणी करण्यात आली आहे. पुढील १२ महिने मिठी नदीतील कचरा हे यंत्र गोळा करणार आहे.

    मुंबई – मिठी नदीतील गाळाची समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र मिठी नदी परिसरात कार्यरत झाले असून त्याद्वारे नदीवर तरंगणाऱ्या कचरा विल्हेवाट लावण्यात येणार आहे. फिनलँडमधील कंपनी क्लीनटेक स्टार्टअप रिव्हर सायकलने या यंत्राचा शोध लावला आहे.

    हुतामाकीच्या सहकार्याने एक नमुना कचरा संकलक बनवण्यात आले आणि त्याची फिनलँडमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ते मुंबईत आणले जाऊन त्याची एक सलग बांधणी करण्यात आली आहे. पुढील १२ महिने मिठी नदीतील कचरा हे यंत्र गोळा करणार आहे.

    मिठी नदी प्रकल्प हा युएनटीआयएल,व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँड लि.रिव्हर रिसायकल आणि अर्थ ५ आर या भारतातील पर्यावरणीय मोहिमांमध्ये सक्रियअसलेल्या संस्थांच्या जागतिक स्तरावर संयुक्त विद्यमाने चालवला जात आहे. हुतामाकीकडून मिळालेली देणगी ही एक वर्षात रिव्हर क्लीनर चालू करण्यापासून, तो सेट अप करताना कार्यरत ठेवले जात आहे.

    कचऱ्याची परिणामकारकरित्या विल्हेवाट लावण्याच्या आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून पुर्नवापर करण्याच्या कौशल्यांवर अनुभवासाठी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी वापरण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँडला तरंगणारा कचरा आणि ऋतूनुसार स्वच्छता कार्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याच्या बाबतीत देखील माहिती प्रदान करते.

    मुंबईच्या महत्त्वाच्या भागातून वाहणारी एकमेव नदी असलेल्या मिठी नदीला स्वच्छ करण्यामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड उत्साह वाटत आहे. या प्रकल्पामध्ये प्लास्टिक कचरा संकलित करत स्वच्छता करण्यासाठी वापर केला जात असल्याबध्दल अधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.