धारावीमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, १५ जण जखमी

धारावीच्या शाहू नगर झोपडपट्टी परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोेट झाला. या दुर्घटनेत एकूण १५ जण जखमी झाले असून यामध्ये पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

    मुंबई – धारावीमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोेट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (रविवार) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश मिळाल्याची माहिती बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

    धारावीच्या शाहू नगर झोपडपट्टी परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोेट झाला. या दुर्घटनेत एकूण १५ जण जखमी झाले असून यामध्ये पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. जखमींना महापालिकेच्या लोकमान्य टिळक सार्वजनिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर लिक होऊन स्फोट झाला आणि आग लागली. तसेच या ठिकाणातील एका घरात गॅस सिलिंडरमधून गळती सुरू होऊन सिलिंडरने पेट घेतल्याने, त्या घरातील सदस्यांनी सिलिंडर तत्काळ घराबाहेर फेकले. यानंतर झालेल्या स्फोटामुळे त्या घराच्या शेजारी राहत असलेले नागरिक देखील जखमी झाले.