Exams

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘गेट’ प्रवेश प्रक्रिया(gate entrance exam) यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी आयआयटी मुंबईकडून देण्यात आली आहे. 

मुंबई: पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी(engineering entrance) आवश्यक असलेली ‘गेट’ प्रवेश प्रक्रिया(gate entrance exam) यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी आयआयटी मुंबईकडून देण्यात आली आहे.  १४ व १५ डिसेंबरला विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलता येणार आहे.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येत आहे. नुकतेच परीक्षा समितीकडून परीक्षेसंदर्भातील माहिती https://gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भातील अनेक तक्रारी परीक्षा समितीकडे आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि कोरोनाचा प्रभाव याची दखल घेत गेट २०२१ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना परीक्षा समितीने दिली आहे. त्यासाठी १४ व १५ डिसेंबरला आयआयटी मुंबईकडून ऑनलाईन पोर्टलची https://appsgate.iitb.ac.in ही लिंक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ही सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. गेट परीक्षा ५ ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. हॉलतिकिट जारी करण्याचे महत्त्वाचे काम शिल्लक आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल, असेही आयआयटी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.