'Gayachap' planted lime worth Rs 335 crore; Income tax evasion on unaccounted assets

संगमनेर येथील गायछाप हे उत्पादन संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहे. १७ फेब्रुवारीपासून या उत्पादकाच्या ३४ ठिकाणावर इन्कम टॅक्सने धाडी टाकल्या. या धाडसत्रात १ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. यासह स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या ९ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद नसल्याची कबुली व्यावसायिकांनी दिली आहे.

    मुंबई : प्रसिद्ध तंबाखु उत्पादक असलेल्या ‘गायछाप’ ने इन्कम टॅक्सला कोट्यावधींचा चुना लावला आहे. ‘गायछाप’च्या उत्पादकावर इन्कम टॅक्सने धाड टाकली. या छापेमारीत ३३५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे.

    संगमनेर येथील गायछाप हे उत्पादन संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहे. १७ फेब्रुवारीपासून या उत्पादकाच्या ३४ ठिकाणावर इन्कम टॅक्सने धाडी टाकल्या. या धाडसत्रात १ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. यासह स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या ९ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद नसल्याची कबुली व्यावसायिकांनी दिली आहे.

    इन्कम टॅक्सच्या चौकशी दरम्यान काही हस्तलिखित नोंदी व एक्सेल शिट्सच्या माध्यमातून २४३ कोटी रुपयांच्या तंबाखुजन्य पदार्थांची विक्री रोखीने करुन कोणताही व्यवहार न दाखवता करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर तंबाखुची विक्री करणार्‍या काही वितरकांवर करण्यात आलेल्या कारवाईतून आणखी ४० कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार पुढे आले आहेत. इन्कम टॅक्सच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.