‘गेंडास्वामी घाबरला! इतकी फाटली तर कशाला भानगडीत पडला?’; निलेश राणेंचा अनिल परबांवर हल्लाबोल

मला २८ ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. त्यात ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यानंतरची वेळ द्यावी’, असं मंत्री अनिल परब यांनी पत्रात लिहिलं आहे. दरम्यान परब यांच्या या पत्रावरून भाजप नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. ‘इतकी फाटली तर कशाला भानगडीत पडला?’ असे म्हणत परब यांचा उल्लेख गेंडास्वामी असा केला आहे. निलेश राणें यांनी ट्विट केले आहे.

  मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीचा समन्स बजावला होता. त्यासाठी आज ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, अनिल परब आज ईडीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. ईडीने नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अनिल परब चौकशीला गेलेच नाही. त्यांनी याबाबतचं कारण ईडी कार्यालयाला पत्राद्वारे कळवलं आहे. त्याचबरोबर हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. अनिल परब यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला पत्र पाठवलं आहे.

  अनिल परबांनी ईडीला काय कारण दिलंय?

  मला २८ ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. त्यात ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यानंतरची वेळ द्यावी’, असं मंत्री अनिल परब यांनी पत्रात लिहिलं आहे. ‘नोटीशीत चौकशीचं कारण लिहिलं नाही. त्यामुळे चौकशीचं कारण स्पष्ट करावं. कारण मला चौकशीत योग्य माहिती देता येईल’, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.

  दरम्यान परब यांच्या या पत्रावरून भाजप नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. ‘इतकी फाटली तर कशाला भानगडीत पडला?’ असे म्हणत परब यांचा उल्लेख गेंडास्वामी असा केला आहे. निलेश राणें यांनी ट्विट केले आहे.

  निलेश राणेंनी काय ट्विट केलंय?

  ‘गेंडास्वामी घाबरला… इतकी फाटली तर कशासाठी भानगडीत पडलास. आता लाव फोन रत्नागिरी एसपीला आणि विचार वाचवायला येतोस का?? या शब्दांत परब यांच्यावर टीका केली आहे.

  दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली तेव्हाची अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये ते नारायण राणेंच्या अटकेबाबत बोलताना दिसून येत आले. त्यामुळे राणे कुटुंबीयांकडून परब यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा दिसून येत आहे.