सोने आणि चांदीचा प्रतीकात्मक फोटो
सोने आणि चांदीचा प्रतीकात्मक फोटो

  • २४ कॅरेट सोन्याचे दर भाव ५० हजार ५३७ रुपयांवर

मुंबई (Mumbai):  महाराष्ट्रातील सराफा बाजारात शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. राज्यात शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा (१० ग्रॅम) ५० हजार ५९७ रुपये इतके होते. राज्यात २२ कॅरेट सोन्याचे दर ४९ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ५० हजार ५३७ रुपये तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४९ हजार ५१७ रुपयांवर पोहोचले होते. भारतात २४ कॅरेट सोन्याचे दर ५३ हजार ६५० रुपयांपर्यंत गेले. यावसह २२ कॅरेट सोन्याचे दर ४९ हजार ५१७ रुपये इतके नोंदविण्यात आले. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ नोंदविण्यात आली. भारतात शुक्रवारी प्रति किलो चांदीचे दर ६१ हजार ४०० रुपये इतके होते.