तयारीला लागा; एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर रोजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिल्यानंतर या परीक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परीक्षेबाबत आयोगाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले असून या परिपत्रकानुसार, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

    मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिल्यानंतर या परीक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परीक्षेबाबत आयोगाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले असून या परिपत्रकानुसार, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

    आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासोबतच परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होणार नाही, असे देखील परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]