घाटकोपर, मानखुर्द उड्डाणपुलाचे काम २५ जुलैला पूर्ण होणार; छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव देण्याचा शिवसेनेचा निर्धार

घाटकोपर, मानखुर्द उड्डाणपुलाचे काम (As the work of Ghatkopar, Mankhurd flyover) अपूर्ण असल्याने या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे नाव आता देता येत नाही, असा प्रस्तावावर प्रतिकूल शेरा मारून हा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी राखून ठेवल्यानंतर यावर बराच वादंग झाला.

    मुंबई (Mumbai).  घाटकोपर, मानखुर्द उड्डाणपुलाचे काम (As the work of Ghatkopar, Mankhurd flyover) अपूर्ण असल्याने या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे नाव आता देता येत नाही, असा प्रस्तावावर प्रतिकूल शेरा मारून हा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी राखून ठेवल्यानंतर यावर बराच वादंग झाला; मात्र आज स्थापत्य समिती उपनगरे अध्यक्ष स्वप्निल टेंबवलकर यांनी पालिकेचे पुल अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांच्या समवेत पाहणी केली.

    २५ जुलै पर्यंत उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी त्यांना दिला असून त्यानंतर या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नांव देण्यात येणार आहे, असा त्यांनी निर्धार केला आहे. यात कोणतेही राजकारण नाही, असे टेंबवलकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

    घाटकोपर, मानखूर्द उडडाण पूलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव दयावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी १ डिसेंबर २०२० रोजी पत्र देऊन केली होती. या उड्डाण पुलाच्या नामकरणाबाबत प्रशासनाने स्थापत्य समितीत अभिप्राय मांडला होता. सध्या पुलाचे बांधकाम सुरु असल्याने नामकरण करणे योग्य नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. यावर भाजपाने सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव या पुलाला दयावे, अशी मागणी केली आहे.त्यामुळे आम्हाला श्रेय मिळू नये असे सत्ताधाऱ्यांना वाटत आहे, असा आरोप केला; परंतु नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी प्रथम पत्र दिल्याने त्यांनुसारच प्रस्ताव उपनगरे स्थापत्य समितीत आला.

    पालिका आयुक्तांनी पुलाचे काम अपूर्ण असल्याने नामकरण करता येत नाही, असे सांगत या प्रस्तावावर प्रतिकूल शेरा मारला. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता; परंतु आता या महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचेच या पुलाला नांव देण्याचा निर्धार अध्यक्ष टेंबवलकर यांनी केला. भाजपला फक्त राजकारणच करायचे होते. श्रेय घेण्याचा प्रश्‍न नाही. यापुलाला छत्रपतींचे नाव मिळावे ही प्रत्येक सदस्यांची भूमिका आहे.त्यानुसार ती फलद्रुपास येत असल्याचा विश्वास टेंबवलकर यांनी व्यक्त केला.