तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंतीलाही सुट्टी द्या; भाजपची मागणी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तारखे प्रमाणे साजरी होणाऱ्या 19 फेब्रुवारी या जयंतीदिनी शासनाने शासकीय सुट्टी दिली आहे. मात्र बहुतांश शिवभक्त शिवजयंती तिथी प्रमाणे साजरी करत असल्याने दरवर्षी तिथी प्रमाणे येणाऱ्या जयंतीदिनी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रंशु दीक्षित यांनी केली आहे.

    मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तारखे प्रमाणे साजरी होणाऱ्या 19 फेब्रुवारी या जयंतीदिनी शासनाने शासकीय सुट्टी दिली आहे. मात्र बहुतांश शिवभक्त शिवजयंती तिथी प्रमाणे साजरी करत असल्याने दरवर्षी तिथी प्रमाणे येणाऱ्या जयंतीदिनी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रंशु दीक्षित यांनी केली आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीक्षित यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात म्हंटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे मोठ्या आनंदात साजरी केली जाते. हजारोच्या संख्येने शिवभक्त शिवरॅली काढतात. तर अनेक तरुण शिवरायांची वेशभूषा साकारतात.

    सदर शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्तांना शामिल होण्यासाठी नोकरीतून वेळ काढून त्रास सहन करावा लागतो. शिवसेना देखील तिथी प्रमाणेच शिवजयंती साजरी करते. शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने तिथी प्रमाणे येणाऱ्या शिवजयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी शुभ्रंशु दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.