राज्यातील ७२ हजार एसटी कर्मचा-यांना कोरोना लस प्राधान्याने द्या ; परिवहनमंत्र्याना सदाभाऊ यांनी पत्र पाठवून केली मागणी

कर्मचा-यांचा समावेश कोरोना लशीसाठी केला जात नाही हे सरकारचे अपयश आहे. एस टीचे कर्मचारी  जीवाची जोखीम पत्करून सेवा देत आहेत मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकारने घेतली पाहीजे असे खोत यांनी पत्रात नमूद केले आहे

    मुंबई : राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयतक्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ७२ हजार एसटी कर्मचा-यांना कोरोना लस प्राधान्याने देण्याची मागणी परिवहनमंत्री अनिल परब यांना पत्र पाठवून केली आहे. खोत यांनी पत्रात म्हटले आहे की थेट लोकांमध्ये जावून काम करणा-या कोरोना योध्द्यांना ही लस प्राधान्याने देण्यात येत आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणा-या एसटी कर्मचा-यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की पहिल्या लाटेमध्ये सुमारे १०७ कर्मचारी कोरोनाला बळी पडले आहेत. मात्र तरी देखील या कर्मचा-यांचा समावेश कोरोना लशीसाठी केला जात नाही हे सरकारचे अपयश आहे. एस टीचे कर्मचारी  जीवाची जोखीम पत्करून सेवा देत आहेत मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकारने घेतली पाहीजे असे खोत यांनी पत्रात नमूद केले आहे