विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना तातडीने मदत द्या, दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तशी माहिती खुद्द दरेकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

    मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तशी माहिती खुद्द दरेकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

    शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे.

    एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको’

    तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. तर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या!, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.