दहावी बारावीच्या मार्कशीटसोबत मायग्रेशन सर्टिफिकेट द्या!

एका बोर्डातून दुसऱ्या बोर्डात प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जे बोर्डाकडून मिळते. कोरोना काळात मागील वर्षी शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने मिळत होते यंदा पण बोर्डाकडून मागच्या वर्षाचीच लिंक देण्यात आली आहे. पण या लिंक मध्ये काही तांत्रिक दोष आहेत त्यामध्ये दहावी परीक्षेचे केंद्र नंबर, केंद्राचे नाव व वर्ष भरल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही.

    मुंबई : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट सोबत मायग्रेशन सर्टिफिकेट देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने शिक्षण मंडळाकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे ही मागणी करत याची पुर्तता तातडीने करावी असे म्हटले आहे.

    एका बोर्डातून दुसऱ्या बोर्डात प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जे बोर्डाकडून मिळते. कोरोना काळात मागील वर्षी शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने मिळत होते यंदा पण बोर्डाकडून मागच्या वर्षाचीच लिंक देण्यात आली आहे. पण या लिंक मध्ये काही तांत्रिक दोष आहेत त्यामध्ये दहावी परीक्षेचे केंद्र नंबर, केंद्राचे नाव व वर्ष भरल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही.

    यंदा दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राचे नाव, नंबर कसे टाकायचे असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे बोर्डाने एक तर या लिंक मध्ये आवश्यक तो बदल करावा अथवा सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना मार्कशीट सोबत स्थलांतर प्रमाणपत्र द्यावे त्यामुळे लिंक च्या किचकट प्रक्रियेतून पालकांना होणारा मनस्ताप वाचेल असे भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.