वैमानिकांना आर्थिक भरपाई द्या ; उच्च न्यायालयात याचिका

अनेक वैमानिकांना कोरोना आणि म्युकरमायकोसिसमुळे कायमस्वरूपी आजार आणि अपंगत्व आले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. यासोबतच लसीकरण मोहीमेतर्गत हवाई वाहतूक कर्मचारी असा स्वतंत्र विभाग तयार करून त्यांना प्राधान्याने लस देण्यात द्यावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.

    मुंबई : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या विमान सेवेतील वैमानिकांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी करणारी जनहित याचिक फेडरेशन ऑफ इंडियन पायलटच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

    विविध विमान सेवा क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या अनेक वैमानिकांना कोविड-१९ बाधित झाले आहेत. तर अनेकजण मृत्यूमुखी पडले आङेत. विमान सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून सेवा देण्याचे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर सुमारे दहा कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलटच्या वतीनेदाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे.

    अनेक वैमानिकांना कोरोना आणि म्युकरमायकोसिसमुळे कायमस्वरूपी आजार आणि अपंगत्व आले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. यासोबतच लसीकरण मोहीमेतर्गत हवाई वाहतूक कर्मचारी असा स्वतंत्र विभाग तयार करून त्यांना प्राधान्याने लस देण्यात द्यावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.

    कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, केंद्र सरकारने प्रत्यक्ष सेवेत असलेल्या पोलीस, होमगार्ड आणि सरकारी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचारी संबोधित केले असून त्यांना लसीकरण आणि विमा संरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे हवाई वाहतूक कर्मचाऱ्यांनादेखील दोन्ही सेवा उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली आहे. याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.