नारायण राणेंना भाजपामध्ये महत्व दिल्याने शिवसेना जवळ येण्याचे मार्ग बंद; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच कायम राहणार

नजिक भविष्यात नारायण राणे यांना भाजपामध्ये महत्व दिल्याने शिवसेना देखील भाजप जवळ येण्याचा मार्ग बंद झाल्या सारखा आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पुढील विधानसभेच्या निवडणुकांची वाट पहावी लागणार आहे.  केंद्रात त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संभाव्य मंत्री म्हणून जागा मिळण्याची जी चर्चा केली जात होती तिला आता पूर्णविराम लागला  आहे.

  मुंबई : मागील महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बंदव्दार चर्चा केल्यानंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा युतीच्या चर्चा चे फुटले होते. मात्र नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावल्यानंतर या सा-या बाजारगप्पा होत्या हे स्पष्ट झाले आहे. त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून दिल्लीत नेवून शिवसेनेसोबत जुळवून घेतले जाण्याच्या मिथकांनाही अर्थ राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राज्याची फडणविशी देवेंद्रांच्या नेतृत्वात भाजप करत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याचे राजकीय जाणकार मान्य करत आहेत.

  फडणवीस महाराष्ट्रातच राहणार

  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असलेल्या संभाव्य नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश नाही. त्यामुळे आता सध्या तरी फडणवीस महाराष्ट्रातच राहणार असून राज्यातील भाजपच्या राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर अनपेक्षितपणे फडणवीस यांना राज्यात मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी पाच वर्षे कारभार केला.

  शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष सोबत असतानाही सरकारवर भाजपची छाप राहील याची खबरदारी फडणवीस यांनी घेतली. भाजपच्या केंद्रातील नेत्यांशीही त्यांचे सूर चांगलेच जुळले होते. मात्र, २०१९ साली शिवसेनेसोबत झालेल्या सत्तावाटपाच्या वादामुळे अनपेक्षितपणे शिवसेनेने मोठी राजकीय मजल मारत दोन्ही काँग्रेस पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर जावे लागले. फडणवीस यांना त्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणून वावरावे लागत आहे.

  नारायण राणेना भाजपामध्ये महत्व

  नजिक भविष्यात नारायण राणे यांना भाजपामध्ये महत्व दिल्याने शिवसेना देखील भाजप जवळ येण्याचा मार्ग बंद झाल्या सारखा आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पुढील विधानसभेच्या निवडणुकांची वाट पहावी लागणार आहे.  केंद्रात त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संभाव्य मंत्री म्हणून जागा मिळण्याची जी चर्चा केली जात होती तिला आता पूर्णविराम लागला  आहे.

  माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीतून आलेले खासदार कपिल पाटील,  आणि भारती पवार यांना केंद्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता  उध्दव ठाकरे यांच्या समोर पुन्हा युतीचा  फॉर्म्युला आणि राज्यातून फडणवीस यांची दिल्लीत रवानगी होणार या राजकीय गप्पा गप्पाच राहणार आहेत हे नक्की! सध्या तरी देवेंद्राची राज्यातील फडणविशी कायम राहणार आहे.