ram kadam and arnab

दरम्यान राम कदम यांनी अर्णबच्या अटकेनंतर मंत्रालयासमोर उपोषण केले होते. उपोषण आंदोलन करत त्यांनी राज्य सरकारचा जाहीर निषेध केला होता. रविवारी राम कदम यांनी अर्णब यांच्या सुटकेसाठी त्यांच्या घरापासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पायी जाऊन साकडं घातले आहे.

मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेनंतर विरोधक त्यांच्या सुटकेसाठी अनेक अकांडतांडव करत आहेत. अर्णबच्या अटकेनंतर भाजपामधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या सुटकेसाठी अनेक आंदोलन केली जात आहे. तसाच राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत आहे. भाजपा आमदार राम कदम (Ram Kadam)हे सोमवारी अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात (Going to Taloja Jail to meet Arnab Goswami) भेटण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असे जाहीर आव्हान त्यांनी केले आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की, आज सकाळी ११ वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णब गोस्वामी यांची भेट घेणार आहे. देशातील १३० कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णब गोस्वामी यांना भेटायला जाणार आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असे त्यांनी जाहीर आव्हान राज्य सरकारला दिले आहे.

दरम्यान राम कदम यांनी अर्णबच्या अटकेनंतर मंत्रालयासमोर उपोषण केले होते. उपोषण आंदोलन करत त्यांनी राज्य सरकारचा जाहीर निषेध केला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना हे उपोषण मागे घ्यावे लागले होते. रविवारी राम कदम यांनी अर्णब यांच्या सुटकेसाठी त्यांच्या घरापासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पायी जाऊन साकडं घातले आहे.