Gold smuggling at Mumbai airport

या महिलांनी योनी आणि गुदाशयातील पोकळीमध्ये सोनं लपवल होते. चौकशीदरम्यान या महिलांकडून एकूण 17 तोळे सोन्याची 3 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. एकूण 937.78 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी प्रकरण सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.

    मुंबई : एनसीबी मुंबईने एक मोठी कामगिरी केली आहे(Gold smuggling at Mumbai airport). सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे(NCB Mumbai intercepted 3 Kenyan women). मात्र, या महिलांनी सोनं तस्करीसाठी अवलंबलेला मार्ग पाहून पोलिसही चक्रावले.

    छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनसीबीने ही मोठी कारवाई केली. यावेळी संशयीतरित्या फिरणाऱ्या  3 केनियाच्या महिलांना अडवले. यावेळी त्यांची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे.