1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी

काॅग्निझंट ही अमेरिकेची आयटी कंपनी आहे. आयटी क्षेत्रातली ही एक अग्रग्ण्य कंपनी आहे. येत्या काळात ही कंपनी भारतीयांना 1 लाख नोकऱ्या देणार आहे. या वर्षी जूनपर्यंत या कंपनीनं जगभरात 3 लाख नोकऱ्या दिल्या आहे. काॅग्निझंट 2021 मध्ये 1 लाख नव्या पदवीधारकांना नोकऱ्या देऊन त्यांना प्रशिक्षण देखील देण्याच्या तयारीत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फरिज यांनी दिली आहे.

    मुंबई : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. एका अहवालानुसार कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत 11 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं समोर आलं होतं. कोरोना काळात अनेक उद्योगंधंदे बंद पडल्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला.

    पंरतु, कोरोना काळात देखील आयटी सेक्टरने अनेकांच्या नोकऱ्या राखून ठेवल्या. त्यातच आता एका आयटी कंपनी यंदा एक लाख नोकऱ्या देण्याच्या तयारीत आहे. काॅग्निझंट ही अमेरिकेची आयटी कंपनी आहे. आयटी क्षेत्रातली ही एक अग्रग्ण्य कंपनी आहे. येत्या काळात ही कंपनी भारतीयांना 1 लाख नोकऱ्या देणार आहे. या वर्षी जूनपर्यंत या कंपनीनं जगभरात 3 लाख नोकऱ्या दिल्या आहे. काॅग्निझंट 2021 मध्ये 1 लाख नव्या पदवीधारकांना नोकऱ्या देऊन त्यांना प्रशिक्षण देखील देण्याच्या तयारीत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फरिज यांनी दिली आहे.

    तसेचं 2022 मध्ये 45000 नव्या पदवीधारकांना नोकऱ्या देण्याची तयारी कंपनी करत आहे. कंपनीने काही महिन्यांपुर्वी पाॅलिसी शिफ्टची घोषणा केली होती. त्यानंतर कंपनीने अंतर्गत कामात महत्वाचे बदल केले आहेत. त्यात कंपनी क्वार्टरली प्रमोशनचा मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर वेळोवेळी जाॅब रोटेशनचा मार्ग देखील सुरू करण्यात येऊ शकतो.

    दरम्यान, काॅग्निझंट कंपनीने आतापर्यंत भारतात 2 लाख भारतीयांना नोकऱ्या दिल्या आहेत. तर गेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी देखील चांगली झाली आहे. कंपनीला तब्बल 41.8 टक्के इतका नफा झाला होता. त्यामुळे आता कंपनीची एकूण कमाई 512 दशलक्ष डाॅलरवर पोहोचली आहे. त्यामुळे कंपनी आता मोठी भरती करू शकणार आहे.