मुंबईकारांसाठी मोठी Good News! कोरोना मृत्यू संख्या शून्यावर; संक्रमणाचा वेग मंदावला

कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष मुंबई महापालिकेने रविवारी (ता.१७) जाहीर केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ (delta variant)चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले असून कोविड लसीकरणाचा प्रभावाने साथ नियंत्रणात असल्याचे निष्कर्षांवरुन सिद्ध झाले आहे. तसेच मुंबईत आज प्रथमच कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यु झाला नाही(Good News Corona Zero Death Day in Mumba).

    मुंबई : कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष मुंबई महापालिकेने रविवारी (ता.१७) जाहीर केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ (delta variant)चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले असून कोविड लसीकरणाचा प्रभावाने साथ नियंत्रणात असल्याचे निष्कर्षांवरुन सिद्ध झाले आहे. तसेच मुंबईत आज प्रथमच कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यु झाला नाही(Good News Corona Zero Death Day in Mumba).

    चाचणीतील निष्कर्षानुसार, ३४३ पैकी १८५ रुग्ण (५४ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ११७ रुग्ण (३४ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित सापडले. इतर प्रकारांचे ४० बाधित रुग्ण (१२ टक्के) आढळले. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य असून त्यापासून गंभीर धोका संभवत नाही.

    डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे.

    पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ५४ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

    दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही.

    लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२१ नागरिकांना बाधा झाली. त्यातील ५७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झाली होती

    वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण ३४३ रुग्णांपैकी २९ जण (८ टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी ११ जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’, १५ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि ३ जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

    चाचण्यांचे निष्कर्ष पाहता नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे देखील कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    मुंबईत आज एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही. आज शहरात एकूण ३६७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून आज ५१८ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. आज मुंबईत नव्याने २८ हजार ६९७ जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मुंबईत ९७ टक्के इतके आहे.