hsc exam english subject only one question paper for all

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा निकष आता ३५ ऐवजी २५ टक्के करण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. राज्य परीक्षा नियोजन समिती यावर विचारविनीमय करत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कमी स्वरूपाचा अभ्यासक्रम देण्यात  आला आहे. यामुळे अभ्यासक्रमाचा विचार करता हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वतर्वली जात आहे.

    मुंबई : राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव व्हावा यासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिल्यानंतर सरकारने आणकी एक मोठी घोषमा केली आहे. दहावी आणि बारावीत पास होण्यासाठी आता ३५ टक्के नाही तर फक्त २५ टक्के मार्क्स होणार आहेत.

    दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा निकष आता ३५ ऐवजी २५ टक्के करण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. राज्य परीक्षा नियोजन समिती यावर विचारविनीमय करत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कमी स्वरूपाचा अभ्यासक्रम देण्यात  आला आहे. यामुळे अभ्यासक्रमाचा विचार करता हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वतर्वली जात आहे.

    ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. खासगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.

    दरम्यान, मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा दहावीच्या परीक्षा सुरु होत्या. कोरोनाचा धोका लक्षात घेता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपरच रद्द करण्यात आला होता. यानंतर विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा करण्यात आली होती.