Good News! 100 टक्केला फक्त तीनच टक्के कमी; महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ % एवढे

राज्यात रविवारी ४,०५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८६,१७४ झाली आहे. काल ५,९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९४,७६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ % एवढे झाले आहे.

    मुंबई : राज्यात रविवारी ४,०५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८६,१७४ झाली आहे. काल ५,९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९४,७६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ % एवढे झाले आहे.

    राज्यात आता एकूण ५०,०९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात रविवारी ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४८,५४,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८६,१७४ (११.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९९,९०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,००७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ४९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४६३४१ एवढी झाली आहे. तर २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९९३ मृत्यूची नोंद करण्यात आली.