मालाड भागातील दलित, हिंदू कुटुंबीयांची गोपाळ शेट्टी यांनी घेतली भेट; पीडितांना सुरक्षा देण्याच्या सूचना

एका वस्तीत पूर्वी १०० अनुजाती जमातीचे कुटुंब होती मात्र येथील गुंडाकडून त्यांच्यावर वस्ती सोडण्यासाठी दबाव आणला गेल्याचा आरोप येथील जाधव परिवार व इतर ९ कुटुंबीयांनी केला आहे.

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून मालाडच्या मालवणी भागात ९ दलित हिंदू कुटुंबीयांना घर सोडून जाण्यासाठी इतर धर्मीयांकडून दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे. याविषयीचे वृत्त देखील काही नवराष्ट्र वर्तमापत्रात व इतर वर्तमानपत्रात छापून आले होते. काही समाजविघातक व्यक्तींकडून या कुटुंबीयांना सतत त्रास देणे व बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर ‘व्हॉईस ऑफ मुंबई’ या संस्थेने दलितांवर होणाऱ्या अन्यायाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘सत्य शोधक समिती’ नियुक्त केली आहे. ही समिती वाय. सी. पवार, निवृत्त पोलिस अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली काम करत असून यात, लेखिका व वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे, झी २४ तास वृत्तवाहिनीचे माजी संपादक उदय निरगुडकर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मनप्रीत सिंह, पत्रकार श्रीमती योगिता साळवी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गाडे यांचा समावेश आहे. आज रोजी ही सत्यशोधक समितीने मालवणी भागात सोमवार दिनांक .११ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता भेट देवून तेथील समस्यांची प्रत्यक्ष माहिती. घेतली उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी मालवणी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आर कालपाडे यांची भेट घेवून योग्य ती कारवाई करावी व पीडित परिवाराला संरक्षण द्यावे अशी मागणी केली.

मालवणी, मालाड भागातील दलित हिंदू कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्याबाबत. सत्यशोधक समिती अध्यक्ष वाय सी पवार खासदार गोपाळ शेट्टी व व्हॉईस ऑफ मुंबई यांची पीडितांच्या घरी भेट, मालवणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कालपाडे यांना योग्य कारवाई करून पीडितांना संरक्षण देण्याच्या सूचना