कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा…., आमदार गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना इशारा

माननीय संजय राऊत,(Sanjay Raut)कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा 'तुमच्या हम करे सो' कायद्याच्या फुग्याला देशाच्या काना कोपऱ्यातून भोके पडतील असे गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी म्हटलेआहे.

    मुंबई : आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतात ? राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला(Varun Desai) अटक का होत नाही? हेच तुमचे महाराष्ट्र मॉडेल(Maharashtra Model) आहे का ? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gapichand Padalkar) यानी खा संजय राऊत यांना केला आहे.

    बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर
    पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का?  हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उजळ माथ्याने महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात.

    कमरेचे डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याची विकृती
    मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारायचे आहे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते.  माननीय संजय राऊत, कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या काना कोपऱ्यातून भोके पडतील असे त्यांनी म्हटले आहे.