Uddhav Thackeray's statement is indecent to the Chief Minister

दरेकर म्हणाले की  हे अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचे सरकारचे पूर्वनियोजित धोरण होते. आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केवळ सरकारने सोपस्कर पूर्ण केले. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा विषय, कोरोनाचे संकट, महिलांचे विनयभंग, बलात्कार, अत्याचार असे गंभीर प्रश्न आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी दोन आठवड्यांच्या अधिवेशनाची आपण मागणी केली होती. असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई : हिवाळी अधिवेशन अवघ्या दोन दिवसाचे घेण्याचे सरकारने जाहीर केले आहे. राज्यातील जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन आठवड्याचे अधिवेशन गरजेचे होते. परंतु सरकारला आक्रमक विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जायचे नाही. तसेच काही महत्वाच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील, ही सरकारला भीती आहे. म्हणूनच अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना केला .

दरेकर म्हणाले की  हे अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचे सरकारचे पूर्वनियोजित धोरण होते. आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केवळ सरकारने सोपस्कर पूर्ण केले. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा विषय, कोरोनाचे संकट, महिलांचे विनयभंग, बलात्कार, अत्याचार असे गंभीर प्रश्न आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी दोन आठवड्यांच्या अधिवेशनाची आपण मागणी केली होती. असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज सरकारने सर्वच सार्वजनिक स्थळे उघडी केली आहेत. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळून देण्यासाठी विधिमंडळाचे सभागृह आहे ही गोष्टही आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली, असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी दिशासारखा कायदा आणण्याचे सूतोवाच या सरकारने केले होते. पण वर्ष झाले तरीही सरकारने यावर काहीच केले नाही.

त्यामुळे या अधिवेशनात दिशा कायदा आणावा, तसेच मराठा आरक्षण संदर्भात सरकारचे नेमके काय धोरण आहे, हे जनतेला कळले पाहिजे. त्याचे उत्तर सरकारने अधिवेशनात द्यावे अशी मागणीही विरोधी पक्षामार्फत करण्यात आल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.