राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला आता न्यायालयाने विचारणा केल्यानंतर तरी निर्णय घेतील : नवाब मलिक यांना विश्वास.

विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी निर्णय घेतला नाही. मात्र जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही फाईल ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार याची वाट पहावी लागणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

    मुंबई : जनहित याचिकेत न्यायालयाने विचारणा केल्यानंतर तरी बारा नाम नियुक्त आमदारांबाबत निर्णय राज्यपाल घेतील आणि  न्यायालयाला कळवतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ता आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

    फाईल ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी की निर्णय घेण्यासाठी