उशिराने कोरोना वाढल्यानंतर का होईना शासनाने सूचना अंमलात आणली : मनसे नेते नितीन सरदेसाई यांना समाधान

गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून आणि ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी.

    मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी काल झालेल्या जिल्हाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत परप्रांतातून येणाऱ्या मजूरांची नोंद ठेवून त्यांच्या चाचण्या आणि लसीकरण याव लक्ष देण्याची सूचना केली होती. हीच मागणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून केली होती. मनसेची ही सूचना उशिराने कोरोना वाढल्यानंतर का होईना शासनाने सूचना अंमलात आणली याबाबत मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले आहे.

    मजुरांची नोंदणी करण्याची सूचना राज्य शासन प्रत्यक्षात उतरवणार आहे. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी ही सूचना केली होती, मात्र त्याकडे राजकारण म्हणून पाहिले गेले. आता कोरोना वाढल्यावर सरकारला हे पुन्हा सुचले हे चांगले आहे. आतातरी मजूर, कामगार यांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी काटेकोरपणे केली गेली पाहिजे.

    नितीन सरदेसाई, मनसे नेते

    गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून आणि ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल अशा सूचना काल मुख्यमंत्री ठाकरे यानी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.